अमोल जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून होता, अनुकंपा खाली त्याला नौकरी लागली , वडील ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने गेले , ते देखील शिपाईच होते, पण माळकरी सर्व कर्मचारी त्यांना बुवा म्हणायचे, बुवा म्हणजे देव माणूस घर ते काम आणि काम ते घर एवढंच, केवळ वर्षातून एकदा वारी ठरलेली असायची, अमोल आणि अनिता त्यांची हे दोन आपत्य,अमोल एकुलता एक मुलगाअसल्याने बुवा त्याचा फार लाड करायचे आणि आई देखील तसेच, आणि ह्या लाडापायी तो बऱ्यापैकी हट्टी झाला, बुवा गेले तेव्हा अमोलने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती, आणि अनिता दहावी मध्ये अमोल ने कसेबसे बारावी काढली आणि बी.ए करू लागला अनिता बारावी करून नर्सिंग चा कोर्स करू लागली, बुवांच्या पेन्शन वर सर्वकाही चाले होते,गावठाणात त्यांचा स्वतःचा जुना वाडा होता, दोन एक भाडेकरी ठेवून त्या पैशातने घर चालू लागले, अनिता बघता बघता नर्स झाली आणि परीक्षा पास होऊन सिव्हिल मध्ये कामाला लागली, अमोलच अजून काय बस्तान बसले न्हवते, अनिताला चांगले स्थळ येऊ लागले आणि तीचे लग्न उरकलं आणि ती सासरी निघून गेली . अमोलचा देखील झेडपी मध्ये अनुकंपा खाली नंबर लागला आणि तो देखील कामाला लागला बघता बघता त्याच ही लग्न झाले आणि पाच एक वर्षात आईने दोन्ही नात्वांना बघून डोळे मिटले आई सुखाने गेली होती.
दिवसे जात होती आईला मिळणारी पेन्शन बंद झाली, त्यात अमोला प्याचा नाद लागला,घरात कोणी मोठं न्हवत जाब विचारायला,अमोलची सहचारिणी संध्या ही फार गरीब आणि सुशील होती, सासूची पूर्ण सेवा केली होती सासूचा आशीर्वाद घेतला होता सासुला शब्द दिला होता बायको आणि आईची स्वतःहून जवाबदारी पार पाडेल म्हणून, आणि अमोलच्या पिण्याला तिन्हे सुरुवातीला कान्हा डोळा केला, पण आत्ता त्रास होऊ लागला होता अमोलला वरचे चार पैशे मिळू लागले होते, आणि त्यात हे व्यसन जडलं संध्या त्याला समजावून सांगत होती पण तो ऐकत नसे, रोज रात्री पिउन यायचाच, सोन्या सारखी दोन पोरं होती पण त्याला त्यांचं काही वाटत न्हवतं, बहीण अनिताने येऊन समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तूर्त हो म्हणून पहिला पाढा पंचावनचा हेच गिरवले,तो काय ऐकला नाही आणि त्याचं पीने पूर्वी पेक्षा ज्यास्त झाले, रोज रात्री पिउन उशिरा येऊ लागला कधी कधी ज्यास्त झाली की रिक्षात यायचा दरवाजा आपटायचा, आदळायचा पूर्ण वाडा जागा व्हायचा पण त्याला भान नसे, कधी जेवायचा कधी तसंच उपाशी बेधुंद होऊन झोपायचा, लेकरं मोठी होऊ लागली होती,मोठ्या मुलीला समजू लागलं होतं, पण त्याला भान न्हवते, घरात पैश्याची चण चण भासू लागली,मग आत्ता संध्याने शिकवणी घ्याला सुरुवात केली लोकांचे शिवण काम व जसं जमेल तसे संसार जोडू लागली, पोरं पण वाढवायचे होते संसाराचा गाडा ती ओढू लागली, चांगल्या चुंगल्या घराला नजर लागली, बुवाचा वाडा भक्कास दिसू लागला, पण त्याला विलाज न्हवतं जसे मिळेल त्यात संध्या भागवू लागली अमोल ने घरात पगार द्याचे कधीच बंद केले होते पण संध्या तुटली नाही ती तटस्थ होती .
मग हा लॉकडाउन पडला सगळं मंदावले कामे बंद झाली शिकवण्या संपतच आले होते अमोल आत्ता दिवस भर घरात असायचा आणि रात्री बाहेर पडायचा व पिउन यायचा असे दोन चार दिवस प्याला भेटले पण नंतर बंदच झाले, कारण त्याला ब्लॅक मध्ये घेऊन प्याचं परवडत न्हवतं एवढे पैसे न्हवते त्याच्याकडे, मित्र हात वर करू लागले ज्यांच्यावर खर्च केले ,ज्यांना उसने दिले ते फोन उचलत न्हवते सगळ्यांनी त्याला डावले होते, पण त्याने चिक्कार संध्या कडे एका शब्दाने पैसे मागितले नाही, तो चांगुलपणा त्यात शिल्लक होता, त्यांना पाहिलं होतं संध्याच कष्ट, तो दिवसा शांत असायचा पण रात्री चीड चीड करु लागला स्वतःवर चिडत असे कधी पोरांच्या वरती राग काढत, आणि तेवढी वेळ गेली की कसे बसे दोन घास खाऊन झोपायचा, संध्याने फार दिवसाने अमोला न पिलेले पाहायल, ती मनातल्या मनात फार खुश होती, त्याचा राग राग तिला बरा वाटू लागला, तो उद्रेक जो दाटून होता तो सर्व बाहेर पडत होता, दिवसे लोटत गेली, ह्याचा राग कमी झाला आत्ता दारूची तलब कमी होऊ लागली व जाणवत न्हवती त्यास ,संध्या त्याला घरगुती तुळसी, दालचिनी, व अन्य औषधी काढा करून देऊ लागली, जेणेकरून त्याच्या तब्बेतीवर परिणाम होऊ नाही म्हणून, हल्ली तो सकाळी लवकर उठू लागला अंघोळ करून आई वडिलांच्या फोटोला दिवा बत्ती करू लागला, घराचं दारिद्र्य त्याला दिसू लागले, त्याला फार वाईट वाटले, थोडी बहुत घरची डाग डुजी त्यांनी त्याच्या परेने केली, घर पूर्वपदावर येऊ लागलं संध्याने चार पैशे जोडून ठेवले होते ते ह्या लोकडाउन मध्ये कामी आले, अमोल मुलांच्या मध्ये रमला, त्याला ते आवडू लागलं होतं रोज तो बार मधला अंधुक अंधुक आणि तो घुमसट वासा पेक्षा त्याला घरातील संध्याकाळचा चपाती आणि भाकरीचा सुहास आवडू लागला,तो मुलांचा अभ्यास घेऊ लागला, त्यांच्या सोबत हसू खेळू लागला संध्या फार आनंदात होती, मुलांना आनंदात पाहून संध्या फार खुश असायची, भली भाती जगाचा संबंध लोकडाऊन मुळे न्हवता, पण घरात सगळं विश्व होत आत्ता, आणि एकेदिवशी पेपरला बातमी आली उद्यापासून दारूचे दुकान उघडणार आणि संध्याच्या जीवाची घालमेल वाढली, ती बातमी अमोलने देखील वाचली, ती आता नाराज झाली, जीव कासावीस होऊ लागला उद्यापासून परत तेच सुरू होणार , आजूबाजूला कुजबुज सुरू झाली कोण कुठे बसणार तळीरामांची दिवाळी होती दुसऱ्या दिवशी.
आणि तो दिवस उजाडला अमोलने सकाळीच अंघोळ केली व नाष्टा पाणी करून घराच्या बाहेर पडला, सकाळी कोणाला तरी फोन वर पैश्या संदर्भात बोलत होता, हे संध्याने ऐकले होते, आणि तो घरातून बाहेर निघाला काम आहें लवकर येतो म्हणून, आणि इकडे हिच्या जीवाची घालमेल वाढली काय सुचेनासे झाले पोरांनी दोन वेळा बापाला विचारले तिन्हे सांगितले कामावर गेलेत म्हणून, दुपार उजाडली पोर जेवली पण हिच्या गळ्या खालून घास काय उतरला नाही, मनात नुसता काहूर होता परत पिणार, बेधुंद होणार ह्या थोड्या दिवसात केलेल्या मातीच घरकुल तुटणार ह्या चिंतेत ग्रासली होती, दुपारची संध्याकाळ झाली तरी त्याचा पत्ता न्हवता तिन्हे फोन लावून पाहिले पण मोबाईल आऊट ऑफ रेंज येत होता,आता रात्र झाली मोठ्या पोरीने तिला जेवणाचा आग्रह केला पण तिच्या डोळ्यात अश्रू आले, मुलगी आईच्या जवळ बसून राहिली दोघी पण शांत आणि स्तब्ध होत्या, अखेर वाड्या समोर रिक्षा थांबलेला आवाज आला त्या दोघींच्या हृदयाचे ठोके वाढले, पोरीने आईला कवटाळले,संध्याला कळून चुकले रिक्षा मध्ये आला म्हणजे आज प्रमाणाच्या बाहेर घेतली असेल, काही क्षणात दारावरची कडी वाजली,ती उठली घसा पार कोरडा पडला होता तिन्हे आवंढा गिळा देवाऱ्या जवळ जाऊन माथा टेकला तोपर्यंत इकडे दारावरची कडी वाजत होती, पोरगी आतल्या खोलीत जाऊन झोपली घाबरून,संध्याने थर थरत्या हाताने दरवाजा उघडला समोर अमोल पायरीवर्ती बसला होता रुमालाने घाम पुसत चिडत म्हणाला किती वेळ लावतेस उघडायला झोपली होतीस काय, आणि त्याच्या आजू बाजूस पाच ते सहा पिशव्या होत्या त्यात राशन भरलेलं होत तोच म्हणाला पुढिल तीन महिन्याचं राशन आहें लॉंकडाऊनच काय सांगता येत नाही, आणि छोटा सा एक बॉक्स हातात धरून तिच्या पुढे केला, संध्या सुन्न झाली होती तिला काय अपेक्षित होते आणि काय झाले, ह्यातून ती बाहेर आली नाही ते बॉक्स त्यांना तिच्या हातात ठेवला आणि सगळं सामान घरात घेऊन गेला, ती तशीच स्तब्ध होती त्याने हाक मारली ती भानावर आली आणि तो बॉक्स तसाच हातात घेऊन गेली, तो तिला म्हणाला आग बघ ना त्यात काय ते, संध्याने बॉक्स उघडला आत मध्ये केक होता,ती विसरली होती पण त्याच्या लक्षात होत आज तिचा वाढदिवस होता म्हणून आणि त्याने तिला हॅपी बर्थडे म्हटले,संध्यला राहवलं नाही तिन्हे बॉक्स बाजूला ठेवला आणि त्याच्या कुशीत जाऊन लहान मुला प्रमाणे रडू लागली पोर उठले बाहेर आले आणि केक बघून खुश झाले त्यांना कळले आज आईचा वाढदिवस होता अमोलने संध्याला सावरलं आणि हळूच तिच्या कानात बोला तू जिंकलीस मी सगळं सोडून दिलं आणि संध्या चकाकली तिन्हे स्वताला सावरत तोंडावर पाणी घेतलं देवाऱ्यासमोर दिवा बत्ती केली सासू,सासर्याच्या फोटोला नमन केल, तीच फळ तिला मिळालं होतं . आणि संध्याचा असा अविस्मरणीय वाढदिवस घरात झाला.
#ह्या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहें की व्यसनाच्या अधीन जाऊन संसारची राख रांगोळी होण्या आधी सर्वांना एक सुधरण्याची संधी मिळते ती सोडू नका ,हा लॉकडाउन संध्या कधी विसरणार नाही.आणि आपण देखील.
#पंकजवसंतरावमाचले
#सोलापूर
9545818191