सुधा मूर्ती ह्या नारायण मूर्ती ह्यांच्या पत्नी. त्यांनी सामाजिक क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. त्याचवेळी छंद म्हणून त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. काही पुस्तके मुलांसाठी आहेत.
मी माझ्या आजीला कसे वाचायला शिकवले
सुद्धा मूर्ती ह्यांचे हे पुस्तक अतिशय सुप्रसिद्ध आहे. मूर्ती अतिशय छान पद्धतीने आपल्या आजीची कथा सांगतात जिथे कर्मवीर नावाच्या मासिकांत काशी यात्रा नावाची एक कथा धारावाहिक स्वरूपांत प्रसिद्ध होते असे. सुधा मूर्ती आपल्या आजीला दार महिन्याला हि कथा वाचून दाखवतात. काही महिने सुधा ह्यांना दुसऱ्या गावी जावे लागते. ती जेंव्हा परत येते तेंव्हा तिला समजते कि मासिक वाचता न आल्याने आजीला प्रचंड दुःख झाले होते आणि आपण शाळेंत जाऊ शकलो नाही ह्या व्यथेने त्यांना रडू कोसळते.
मूर्ती तेंव्हापासून आजीला शिकवायचा विडा उचलतात आणि काही दिवसांत आजी प्रचंड मेहनतीने मॅगझीन चे कव्हर वाचू शकते.
शहाणे आणि अति शहाणे (wise and other wise )
सुधा मूर्ती ह्यांनी आपल्या सामाजिक कार्याचे अनुभव इथे विशद केले आहेत. खोटे सांगून बापाला वृद्धाश्रमात पाठविणारा उचभ्रु मुलगा. अगदी मृत्यू समीप आला असता मेहनत घेऊन आपल्याला मदत केलेल्या माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक महिला. दान घेणारा आणि देणारा दोघांनाही कृतज्ञता शिकविणारा एक आदिवासी प्रमुख आणि खूप काही छान कथा त्यांच्या पुस्तकांत आहेत.