#राजकारण
"नाईलाज झालेला माणूस पोहता येत नसताना सुद्धा विहीरीत उडी घेतो" असे मी मागे म्हणालो होतो. त्या माणसाची अवस्था आणि मनाची होणारी घुसमट याचं वेगळं काही विश्लेषण करायला नको. "नाईलाज" या शब्दातच सर्व काही सामावलं आहे. लिहीण्याच्या दृष्टीने राजकारण हा कधीच आवडीचा मुद्दा नव्हता, तशीच गरज पडली तर विशिष्ठ टिप्पणी करायची नाही हे कायम ठरलेल. आज मात्र नाईलाज झाला. मनात नसतानाही विहीरीत उडी घ्यावी लागतीये.
गेल्या काही महिण्यात आपल्या देशात निवडणुकीचं वारं वेगाने वाहत होतं. १३० कोटी देशवासियांच्या तोंडी एकच मुद्दा "राजकारण एके राजकारण". कोणी म्हणे लोकशाहीचं यज्ञ आहे, कोणी म्हणे लोकशाही प्रबळ करायची आहे, मोठेमोठे शब्द हो. प्रथम न्युझीलंड आणि नंतर श्रीलंकेत झालेल्या क्रुरक्रृत्यांवर चकार शब्द काढायला सुद्धा वेळ नव्हता इतके काही लोक पुढार्यांचे तळवे चाटण्यात मग्न होते. त्या निष्पाप जिवांसाठी संवेदना सुद्धा व्यक्त न करावी ? लोकशाहीचं यज्ञ आहे, लोकशाही मजबूत करायची आहे असे मोठमोठे शब्द ऐकायला मिळत होते. वाटलं समंजस झाली आपली जनता, परंतु भ्रमाचा भोपळा फुटायला कितीसा वेळ लागतो ? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणजे सुशिक्षित लोकांचं शहर मानल्या जाणार्या पुण्यात निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी मतदानाची टक्केवारी पाहिली, निव्वळ ४९.९४% इतकी लाजिरवाणी हो. मग काय फुटला भ्रमाचा भोपळा. मग ही मोठमोठे शब्द वापरणारी जमात आली तरी कुठून होती ? ही जमात पैदा झाली होती पुढार्यांच्या तळव्याखालून, ही जमात पोसली जात होती काहीशे रूपयांवर, मांसाच्या एखाद्या तुकड्यावर किंवा मग मद्याच्या एका पेल्यावर. कुण्या एका भल्या माणसाने सुंदर परंतु अवजड असा शब्द वापरावा मग त्याच्या पावलांवर पाऊल ठेऊन शेकडो, मग हजारो, लाखो आणि करोडो लोकांनी तोच शब्द गिरवत बसावं. दुसर्याच्या बुद्धीने चालणारी जमात ती, दुसरं काय अपेक्षित त्यांच्याकडून.
लोकशाहीचं यज्ञ असं जेव्हां म्हटलं जातं तेव्हां यज्ञाचा अर्थ आणि महत्व फार मोठं असतं हे कसं नाही समजत बरं ? आहुत्या द्याव्या लागतात हे कोणी सांगावं यांना, आणि सांगून समजेल ? असो, काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका राजकीय पोस्ट वर सहज लक्ष गेलं. पुढे प्रतिक्रिया वाचल्या. एक प्रतक्रिया वाचून तेथेच थांबावसं वाटलं.
"ओबामांकडे लादेनला मारण्याची फुटेज होती परंतु त्यांनी ती निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वापरली नाही, नष्ट केली. कुठे ओबामा आणि कुठे हा फेकाड्या"
टीप :- मी ना भक्त आहे ना गुलाम. तेव्हा शब्द योग्यरितीने राजकीय मेंदू बाजूला ठेऊन घ्यावेत, आणि हे शब्द माझे मुळीच नाहीत. देशाच्या राजकारणाने युवापिढीला दिलेल्या या शिव्या आहेत.
वैयक्तिक मी कोणत्याही राजकीय पक्षाचं पूर्ण समर्थन करत नाही. पूर्ण समर्थन शक्यच नाही, कारण माझ्या परिसरातील गल्ली बोळांचे रस्ते अजून सुद्धा खड्डेमुक्त नाहीत. पाण्याची मुबलक सोय सुद्धा नाही. साठ वर्षांपूर्वी सुद्धा माझा बंधुबांधव स्टीलच्या थाळीमध्येच भाकरी खात होता अजूनही त्यात वेगळं असं काहीच नाही. माझ्या परिसरातील ट्राफिक पोलिस अजून देखील चौकात उभा राहून सिग्नल प्रमाणे वाहनांना येण्याजाण्याची सुचना न करता एखाद्या झाडाखाली किंवा तीव्र वळणावर उभा राहून सावज येण्याची वाट पाहतोय. असे एक ना अनेक मुद्दे आहेत. एकंदरीत काय कायदा, सुव्यवस्था, प्रगती, विकास या मुद्यांची अक्षरषः ठासून ठेवली गेली आहे. (आजकालची नव्हें तर स्वतंत्र भारतानंतर पासूनची हीच कथा आहे, तेव्हा पूर्ण समर्थन कोणालाच नाही) मग देशातील या सर्वोच्च आणि आग्रही मुद्यांची जेव्हां चौफेर वाट लावली जाते आणि देशाचा युवा चौकाचौकात बसून भारताची अमेरिकेसारख्या देशाशी तुलना करू पाहतो तेव्हां सावध व्हायला होतं, निव्वळ वाचा बरळ बरळ वाटू लागते त्यांची बौद्धिक घोडदौड.
प्रत्यक्षदर्शी पाहता कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, प्रगती, विकास या मुद्यांवर अमेरिका भारतापासून मैलो दूर आहे आणि ते अशासाठी कारण तेथील सरकार तर सरकार जनता देखील याच मुद्यांवर आग्रही असल्याची पहायला मिळते. मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे कि जनता आग्रही आहे. जाती-धर्मांच्या राजकारणासाठी नव्हें तर कायदा सुव्यवस्थेसाठी. उलटपक्षी आपल्या देशात राजकीय मुद्दे हे भातुकलीच्या खेळाप्रमाणे बालिश वाटू लागतात. पुन्हा पुन्हा तेच तेच गोल गोल.
पुन्हा एकदा महत्वाच्या मुद्याकडे वळावसं वाटतं. ओबामांनी लादेनला मारल्याचा पुरावा नष्ट केला(मला काही कल्पना नाही), मोठीच गोष्ट ती परंतु तो नष्ट करण्यापूर्वी "लादेनला मारला" ही बातमी संपूर्ण जगभर पसरली होती. एवढेच नव्हे तर जगाने ती बिनदिक्कत बिनविरोध मान्य केली होती. अर्थातच अमेरिकेच्या जनतेने आणि पर्यायी ओबामांच्या राजकीय विरोधकांनी सुद्धा. एकंदरीत त्यावेळची परिस्थिती स्मरण करता लक्षात येतं कि विरोधकांनी ती बातमी किंवा ती कार्यवाही चिवडत बसण्याऐवजी ती मान्य करण्यात धन्यता मानली नव्हे आनंद मानला. कारण कसं आहे ना पाटील, लादेनला मारला किंवा कोणाच्या सत्तेत मारला हा त्यांच्यासाठी राजकारणाचा मुद्दाच नाही ना. जी प्रतिक्रिया वाचून मला थांबावसं वाटलं त्या व्यक्तिने आणि त्याच्या सारख्या अनेकांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रचाराची भाषणे नक्की ऐकावित. त्यातून लक्षात येईल तेथील निवडणूका कोणत्या मुद्यांवर लढवल्या जातात ? का तो देश पुढे आहे ? आणि का त्या देशाची तुलना आपल्या देशाशी करणे चुकीचे आहे. उलटपक्षी आपल्या देशात मात्र तसं होत नाही. शत्रुदेशाच्या कुक्रुत्यांचा जेव्हां सूड घेतला जातो तेव्हां त्या आगीत राजकीय पुढारी मग ते कोणत्याही पक्षाचे असो आपली भाकरी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांचे चेलेचपाटे काही कमी नाहीत. मालकाने छू म्हणावं आणि याने सोशल मिडियावर येऊन चावत बसावं. असे चित्र असल्यावर अमेरिकेची तुलना भारताशी कशी बरं करावी ?
मुद्दा काय आहे याचं भान नसतंच मुळी. मला लहानपणीचं छान आठवतंं. लहान मुलांना कोणत्याही गोष्टीचं फार अप्रुप असतं. आपल्या सवंगड्याकडे असलेली गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे असा अट्टाहास असतो. काही बदमाश मुले मग काय करतात एखादी गोष्ट स्वतःकडे नसून सुद्धा ती असल्याच्या पःबढाया एका भोळ्या मुला समोर मारत असतात. मग चित्र असे निर्माण होते कि खरंतर त्या बदमाश मुलाकडे ती गोष्ट नसून सुद्धा त्याने मारलेल्या बढायांमुळे त्याय भोळ्या मुलाचं मनोधैर्य खचल्यासारखं होऊन जातं, त्याला राग येतो, त्याला डिवचल्या जाण्याची भावना येते. लहाणपनी अशी बदमाशी करणे अयोग्यच परंतु माझं साधं मत आहे कि देशाच्या सामान्य जनतेने सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक अशामुद्यांमधे बदमाशी करून शत्रु देशाचे मनोधैर्य खचवायला काय हरकत आहे. स्ट्राईक्स झाल्याच नाहीत हा मुद्दा नक्की कोणाचा तर राजकीय विरोधकांचा, त्यांना त्यांची भाकरी भाजून घ्यायची असते त्यात आपण जनतेने लक्ष घालायची गरज काय ? सामान्य जनतेने देशाच्या सैन्यबळाने केलेल्या सुंदर कामगिरीचं स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्यात, जल्लोष करावा. मी तर म्हणतो ते दोन दिवस राष्ट्रीय सण घोषित करून टाकावेत. परंतु हे सर्व करायला जनतेला स्वतःची बुद्धी असावी लागते, त्यांनी राजकीय पुढार्यांचे रोबोट होउन हे सर्व शक्य नाही ना पाटील. देशाची जनता ही मालक असते आणि राजकीय पुढारी हे नोकर. जनतेने राजकीय मुद्यांमध्ये लक्ष जरूर घालावे परंतु वाचा बरळ करण्यात काहीच उपयोग नाही. माझ्या मते जनतेने मालकाच्या थाटात त्या पुढार्याचे ५ वर्षे उचित अनुचित कार्ये पहावीत आणि निवडणुकांमध्ये त्याला त्याची योग्य जागा दाखवून द्यावी.
सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी थोड्या अंधूक झाल्या आहेत परंती एअर स्ट्राईकच्या मात्र अजूनही ताज्या आहेत. मी सतत वेगवेगळ्या माध्यमांतून वृत्तवाहिणींच्या बातम्यांकडे लक्ष ठेउन होतो. ठळकपणे आठवतं, एअर स्ट्राईक झाली आणि त्याचे पुरावे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेउन जाहीर केले होते. पंतप्रधानांनी फक्त देशाच्या जनतेला संबोधित करून हे वृत्त देशाच्या जनते पर्यंत पोहचवले एवढेच. त्यातही त्यांनी सैन्याचे अभिनंदनच केले, ते त्यांचे कर्तव्यच होते. येथे मी वैयक्तिक देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाबद्दल बोलत आहे कारण माझी अशी व्यक्तिगत धारणा आहे कि लहान सहान राजकीय नेत्यांच्या चुकीच्या अथवा बरोबर वक्तव्यांना गृहीत धरून देशाच्या नेतृत्वाचं मुल्यमापन करणे काही योग्य नाही. तेव्हां राजकीय भाकरी कोणी भाजण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टच आहे. मन फेकाड्या, अमेरिका, ओबामा, लादेन, पुरावे, तुलना हे मुद्दे अक्कलशून्य माणसांचे वाटू लागतात.
खरं तर हा सर्व पसारा म्हणजे वराती मागून घोडे असे वाटेल. कोणाला असेही वाटेल आता काय गरज होती या सर्वाची. परंतु कसयं ना पाटील, लोकशाहीच्या यज्ञामध्ये (लोकांच्या बुद्धीने चालणार्या अक्कलशून्य माणसांच्या मते) #बहुदा सर्वच जण अाहुत्या देण्यात (तळवे चाटण्यात, मग ते कोणत्याही पक्षाच्या पुढार्याचे असो) मग्न होते. मग या मुद्यांकडे त्यावेळी लक्ष द्यायला वेळ होता कोणाकडे. असो, निवडणुका संपल्या, निकालही लागले. विशेष म्हणजे जनतेने पुन्हा एकदा तोच कौल दिला. मग तो प्रखर विरोध, अारोप प्रत्यारोप, हेवे दावे हे सर्व पोकळ विरोध करायचा म्हणून विरोध होता असे मी गृहीत धरतो. कारण देशाचं नेतृत्व खरोखर चुकीचं असतं तर जनतेचा कौल नक्कीच दुसर्या पारड्यात पडला असता. आणि आता जेव्हां पाणी एवढे निथळ दिसतच अाहे तेव्हां जास्त मुद्दे उपसण्यात मलाही रस नाही. देशाने स्वतःचं नेतृत्व निवडलं अाहे, देशाचा नेाता निवडला आहे. देशाच्या त्या सर्वोच्च नेतृत्वाला माझ्या मनापासून शुभेच्छा अाणि आशा एकच माझा देश सक्षम, प्रबळ अाणि प्रगत व्हावा.
-------- राज पुणेकर