#अंबरकाचळे मित्र आहे माझा आणि आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. त्याच्याच साठी लिहितोय आज. काही दिवसांपूर्वी मला म्हणाला होता "राज बोलायला आणि डिस्कशन करायला सगळे पुढे येतात, प्रत्यक्ष कृती करायला मात्र कोणी पुढे येत नाही". पटलं होतं माझ्या मित्राचं मला. समस्यांनी ग्रासलेला देश आहे आहे आपला. समस्या १० आणि वाद घालणारे १०० असं गुणोत्तर मांडलं तर वावगं नाही ठरणार. परंतु कोणत्याही समस्येवर वाद आणि डिबेट हे उत्तर होऊच शकत नाही माझ्या मते. गरज असते त्या समस्येला समजून उमजून घेण्याची, त्याच्या मुळापर्यंत जाउन मार्ग काढायची. परंतु त्याही पुढे जाउन विचार करतो मी कि नक्की समस्या आहेच कशासाठी ? मानसिकतेचा प्रश्न आहे का ईथे ?? का प्रश्न आहे समस्ये विरूद्ध लढण्याची ईच्छाच नसण्याचा ??? कारण 'इच्छा तिथे मार्ग' अशा मोठमोठाल्या गोष्टी आपणच सांगतो की. कारण दोन्ही हाथ पाय धडधाकट असताना भीक मागून एखाद्याने So Called मोठं मन करून दिलेला वडापाव ( पैशांच्या बदल्यात ) खाल मानेनं खाताना, कष्ट न करण्याची इच्छा आणि ते न करता सुद्धा मिळतायत सकाळ संध्याकाळ वडापाव ही मानसिकताच किंबहुना आडवी येत असावी. खायला घेतलेला वेफर्स चा रॅपर ५-७ मीटर अंतरावर डस्टबीन असताना तो खाली टाकताना तिथे उठून जाउन त्यात टाकण्याचं कष्ट न करण्याची इच्छा आणि घर माझं आहे रस्ते माझे नाहीत ही मानसिकताच कदाचित आडवी येत असावी, परंतु रॅपर खाली टाकताना आणि रस्त्यांबद्दलच्या मानसिकतेचं प्रदर्शन करताना रस्ते म्हणजे हा देशच आपला नाही याची स्पष्ट ग्वाही देतो आपण. वरील दोन मुद्दे आणि असे अनेक मुद्दे आहेत आपल्याकडे ज्यांवर चर्चेला उधान येताना अनेक वेळा पाहिलय मी, पण प्रश्न अजून तोच नक्की ही समस्या आहेच कशा करता ???? खरंतर वरील सर्व गोष्टींना एकत्र मिक्सर ग्रांईडर मधे टाकता निघालेला रस एकट टाहो फोडताना मला दिसतो...... #जनजागृतीचाअभाव. कारण मानसिकता बदलण्यासाठी मनावरच घाव घालावा लागतो, योग्य शब्दांचा योग्य विचारांचा. आणि कसयं ना पाटील काही राॅकेट सायंस नाही हो त्यात किंवा गीता वाचण्या एवढं अवघड ( खरं तर तेही अवघड नाहीच.. असो ) सुद्धा नाहीये. खुप लहान सहान गोष्टींतून होउ शकते जनजागृती, किंवा असं म्हणा ना आपल्याच ( योग्य ) कृतीतुन.
एकंदरीत काय तर #गरजआहेघावघालण्याचीजनजागृतीचा_घाव
तुझ्या शब्दांच्या प्रेरणेतून लिहीलं मी हे अंबर तेव्हा.. तुझ्याच साठी. वाढदिवसाच्या पुनःश्च एकदा शुभेच्छा. आयुष्याच्या महत्वाच्या उद्देशाकडे वाटचाल करतोय तू, ती करत असताना मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाची मर्यादा आणि शौर्य तुझ्या अंगी राहो