गनिमी कावा !....
“ओल्या नारळाच्या करंज्या येतात का ग तुला ? “ सासूबाईंनी मान वाकडी करून मिताला विचारलं तसं तिला धस्स झालं . खरं म्हणजे बॉस ने ऑफिस मध्ये , ‘मॅडम MIS report आजच्या आज तयार ठेवा असं म्हटल्यावरही इतकं धस्स होत नाही,
काहीतरी गुळमुळीत बोलून , पट्कन डबा पर्समध्ये घालून ती ऑफिसच्या गडबडीत आहे असं दाखवून निघाली ,
लग्न होऊन नुकत्याच झालेल्या हनीमूनच्या गुलाबी आठवणीत अजून रमलेल्या मिताला आधीच ऑफिस ला जायचं जीवावर आलेलं , मस्त मऊमऊ गादीवर लोळत आपले रोमँटिक स्नॅप्स पाहावेत , फेसबुक वर त्याचं प्रदर्शन मांडून ओहनी i लव्ह you असं काहीतरी लिहून मग मनातून जळलेल्यापण वरकरणी ‘how sweet !.., ‘jodi no 1 “ अशा आलेल्या कंमेंट्स ना reply करावं आणि मग अर्हदच्यामिठीत विरघळून जावं असं काहीसंतिला खूप वाटत होतं , पण ‘ओल्या नारळाच्या करंज्या येतात का गंतुला ? “ अशा पराभूत करणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यापेक्षा ऑफिसला गेलेलं बरं , निदान तिथे आपण अंजिक्य आणि अभेद्य असतो , तिला वाटून गेलं. आणि अजूनरजा शिल्लक असताना ती ऑफिसला गेली . “आहात का घरात ,बाबीताई ? “
“आहे की ,मी कुठे जाणार या वेळेला ? “बाहेरून शेजारणीचा आवाज आला तशा बाबीताई किचन मधून हात पुसत बाहेर आल्या .
“नाही म्हटलं नवीन सुनबाईंच्या हातचा चहा घ्यावा म्हणून आले .”
“आहे कुठे घरात ,पळाली ऑफिस ला “
“बाकी सून मस्त मिळाली हो तुम्हाला देखणी ,चटपटीत , हुशार ”
“ देखण्या आजकाल सगळ्याच असतात , इंटरनेट , you tube वर सुंदर दिसायचे ,’सिम्पल ब्युटी secrets ‘ ढिगाने असतात देखण्या न दिसून सांगतील कुणाला ?” शेजारणीच्या हातावर टाळी देत हसत हसत बाबीताई सोफ्यावर टेकल्या ,
” आणि हुशार आहे हे कळलं मला हो सकाळी नुसतं विचारलनं , ‘ओल्या नारळाच्या करंज्या येतात का म्हणून , तर प्रश्नाला बगल देऊन सरळ निघून गेली ऑफिसला , आता मी ही काही सोडणार नाहीचे , आई तर मारे कौतुक करत होती लेकीचं सुगरण आहे, कामसू आहे “ बाबीताई ठसक्यात म्हणाल्याआणि शेजारणीच्यागावगप्पा सुरू झाल्या .
संध्याकाळी अर्हद मितालीला बाहेर जेवायला घेऊन गेला , त्यामुळे मिताली बाबीताईंच्या वाट्याला आलीच नाही .
‘बाबी ?” हे कसलं रे नाव लग्नाआधी एकदा मितालीने अर्हद ला विचारलं , “आहे असंच , पेट्नेम तिचं ,माझे बाबा आईचे आते भाऊ लागतात , म्हणून माहेरचंच नाव continue केलं , तुला काय पण चौकशा ? “
“ अरे असच विचारलं , मला वाटलं कि बार्बी सारख्या होत्या म्हणून बाबानी कौतुकाने ठेवलं असेल तसं नाव आणि मग बार्बी ची बाबो आणि बाबो ची बाबीझाली , “ मितालीने खुदुखुदू हसत म्हटलं , हा टोमणा आईच्या आकारमानालाआहे हे कळल्यावर अर्हदरागावला .तो ,मातृदेवो भव !...categoryतला आहे हे तिला माहिती होतं .
दुसऱ्या दिवशी सकाळी किचन मध्ये दोघींची गाठ पडलीच , सकाळची स्तोत्र म्हणता म्हणता बाबीताईंनी तिच्याकडे एक स्माईल फेकलं , कालचा प्रश्न त्यानां रिपीट करायचा आहे , हे मितालीच्या लक्षात आलं ,त्यांनी ते विसरून जावं म्हणूनतिने पण एक छानसं स्माईल फेकलं , आणि भराभर भाजी चिरायला घेतली , “आई तुम्ही नारळ घालता वरून भाजीत ? “
“ हो लागतोच बाई आपल्याकडे नारळ ज्यात त्यात . अंग हो नारळावरून आठवलं ..... ”
“ओह शीट , “ मितालीने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला , आणि एकदम अर्हद चा मोबाईल वाजतोय वाटतं म्हणत ती लगबगीने बेडरूम मध्ये गेली . बाबीताई गप्प बसल्या , तेवढ्यातआईअर्हदआणि बाबा आत येऊन टेबलाशी बसले , पोह्यांच्या डिशेसत्यांच्यापुढे सारतासारताबाबीताईंनीमिता चीही प्लेट भरली आणि अर्हद च्या चेहेऱ्या वर आईबद्दलचा अभिमान उसळून आला , ते बघून बाबीताई सुखावल्या , “अरे नंतर गडबडीत ती खाणार नाही ना .काळजी घेतली पाहिजे आपलीच आहे आता ती , “ मिताली आत आली , मग तिनेही तेवढ्याच प्रेमाने बाबीताईंची प्लेट भरली , ते बघून अर्हदआणखीन खूष झाला आणि बायकोबद्दलचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावरदिसायला लागला , बाबीताई ना ते अगदीच सहन होईना , मग त्यांनी , परतठेवणीतला प्रश्न काढला , ‘मिताली , तुला ...... “
“आई पोहे खूप मस्त झालेत हा !.. एकच नंबर .. “ अर्हद मध्येच म्हणालाआणि मितालीची त्या भयंकर प्रश्नातून सुटका झाली , संध्याकाळी मग अर्हदलासांगून ती परस्पर आईकडे गेली , “मला ओल्या नारळाच्या करंज्या शिकव “ गेल्या गेल्या मितालीने आईच्या मागे टुमणं लावलं , “अगंहो शिकवते , सांगायचं बाबीताईनामला येत नाही म्हणून , त्यात काय एवढं ?पण पराभव मान्य करशील तर तू मिताली कसली ? म्हणून सांगत होते आपला हा असा बाणेदार स्वभाव नडेल पुढे आपल्याला , सगळे पारंपारिक पदार्थ शिकून घे , “ आईची बडबड निमूट ऐकत मितालीने मोठ्या मेहेनतीने करंज्या शिकून घेतल्या , आणि मग एखाद्या विजयी वीराच्या थाटात ती दुसऱ्या दिवशी किचन मध्ये घुसली . आज तिनेअर्हद च्या आवडीची कारल्याचीभाजी केली , खूप मनापासून . बाबीताईनी उपम्याच्या डिशेसभरायलाघेतल्या , “आई मी आज भाजी पोळीचखाईन ,” मितालीकडे कौतुकानेबघत अर्हद म्हणाला.
“हो खा कि बघ तरी बायको किती छान करते स्वयंपाक “
“व्वा !.. मस्तच , जबरा झालीये भाजी !..” पहिला घास खाऊनच अर्हद खूष झाला .
“मिताली तुला …. “
“हो SSSSS येतात आई मला ओल्या नारळाच्या करंज्या“ मिताली ठसक्यात म्हणाली .
“ अगं करंज्या नव्हे त्या तर येतच असतील सोप्या आहेत , मी विचारत होत्ये कि सुरळीच्या वड्या येतात का तुला ? “....