या वेड्याला
न कसला लोभ , ना कुणाचा राग
नको इस्टेट , नकोय कसला वाद
हवाय तो फक्त आणि फक्त
वाचकांचा आशीर्वाद
भावनांच काय ते
त्या तर येतचं असतात
काही उमटतात पत्रावर
तर काही
पंचतत्त्वी विलीन होतात
या मनातील लाव्हास जर मिळेल
आपुल्या प्रेमाचे इंधन
शब्दांचा वणवा मग भडकेल असा काही
नसेल त्याला कुठलेच बंधन
पर्वणीची त्या वाट पाही
सरस्वती ती उभीच राही
चारी दिशा बघत राही
साद तरी येत नाही
साद तुम्ही द्याल तर
पेटून उठेन मी
अन नाही दिलीत साद तर
आतल्या आत मिटेन मी