एकदा टारझन अंगात आला
काढून टाकले कपडे सर्व
पायपुसण्याचा लंगोट केला
अन् जंगल प्रवास सुरु झाला
कुणीही ओळखू नये म्हणून
काळेकुट्ट हेल्मेट घातले
घराबाहेर पडताक्षणी
सारे कुत्रे मागे लागले
वाट मिळेल तिकडे धावत सुटलो
पारंब्या अन् वेली शोधू लागलो
नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून
उड्या मारू लागलो
आरोळ्या ठोकून ठोकून
माझा घसा सुकला होता
कुत्र्यांचा झुंड कमी न होता
वाढतच चालला होता
धावून धावून माझा
स्टॅमिना गेला होता संपून
कुठं सुचलं हे शहाणंपण
टारझन अंगातून गेला होता कधीच निघून
कुत्र्यांच्या भीतीपायी
लंगोटही सुटून गेला
कमी की काय म्हणून
माझा दिगंबर अवतार सुरु झाला
पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये
जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट
टारझन बनण्याच्या नादात
पुरता झालो होतो चेकमेट