मनाएवढा ग्वाही त्रिभुवनात पाहिला नाही
योग्य, अयोग्य, नीतिबाह्य, बरे, वाईट
ज्याचे त्याचे मन देई , ज्याला त्याला ग्वाही
बाह्यमन असो कसेही
तरी अंतर्मन सारे पाही
कुणाचे मन जागोजागी पळे
कुणाचे क्षणात दुःखाचे तळे
कुणाचे मन नउ मण जळे
मनी कुणी गाठ ठेवता
या मनाची थोरवी
सांगू शके न विधाता
सुखादिकांचे ज्ञानार्जन
मन एकची साधन
असावे सधन, सद्विचारांनी