प्रवास धनगराचा...
धनगर- धनगर आम्ही धनगर माळरानावर वैराण,काळ्यारानावर निवारं...
किती सिद्ध व्हावे त्यांने, दैवावर विसंवुन गड्या
रात्र-दिवस पाहतो भविष्याची स्वप्ने
आम्ही मेंढर चारतो, पापणी अधिर ठेवुनं...
उजाड झाले स्वप्न, नष्ट झाल्या आमच्या आशा
परिश्रमाने केले कष्ट,मोहरल्या अंतरीचा ठावं...
वाटे काळे घोंगड ओढुनं, रात बसली अंधारून...
कुठे पणतीचा उजेडं, लावी अंधार अंधारून
मस्तका गंध पिवळा टिळा...अंगावर घोंगड हातात इळा...
आम्ही मेंढर चारतो पापणी अधिर ठेवुनं
प्रवास वन-वन करी मेंढकरी,आदमापुरची वारी...
दिसे शिक्षण आम्हा अहिल्याबाईचे,नष्ट करू सखल जिने गरीबीचे...
भटकंती करणं जिवनाचा सखोल प्रवास आहे,
सगळं काही सहन करून जगण्याची एक आस आहे...
फिरतो आम्ही आजुन ही शिवार-शिवार, पिढ्यानुपिढ्या वंचित गावोगावावर...
किनार्याविना सागरातली नाव आहे,धनगर-धनगर,
आम्ही धनगर आम्हा सगळं ठाव आहे,
आम्हा सगळं ठाव आहे...
कवी- राजेश भगवान पवार...
9420111621-9922111621
pbjfilms.co@gmail.com