साहेब, जमा झाली का हो
खात्यात दुष्काळी..
दिवाळीला पणतीत
तेल कुठ उरल,
डोळ्यात आसवांच
पाणी फक्त भरल..
दुःखच दुःख फक्त
भरलय आमच्या भाळी,
साहेब जमा झाली का हो
खात्यात दुष्काळी..
दिवाळीले पोरगी आली
ढसाढसा रडली,
पाहुन फाटक धोतर माहा
गळ्यात माह्या पडली...
कशाच लावलय पुरण
कशाची पुरणाची पोळी,
साहेब जमा झाली का हो
खात्यात दुष्काळी...
कपडे नाही घेतले म्हणून
पोरग बसल् रुसुन,
कोपर्यात जावुन रडल
बिचार् हमसुन हमसुन..
ऐन् दिवाळीच्या सणाला
रिकामीच होती थाळी,
साहेब जमा झाली का हो
खात्यात दुष्काळी..
आता नाही सहन होत
दुःखा चा मार साहेब,
जिकड तिकडे दाटलाय
फक्त अंधार साहेब..
कधी वाटतय नशीबानच्
केलीय आयुष्याची होळी,
साहेब जमा झाली का हो
खात्यात दुष्काळी..
राजकुमार नायक
सवना
9921581444
(कविता शेअर करायची असल्यास नावासह करण्यास माझी काहीच हरकत नाही.)