CBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा. शालिमार हि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होणार आहे. कादंबरी असली तरी प्रत्येक प्रकरण हे एक कथा म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते.
प्रकरण पहिले : पार्टनर
कैलास कौल CBI मध्ये जेंव्हां पासून रुजू झाला तेंव्हापासून त्याचे नाव सर्वांच्या तोंडी होते. अत्यंत लहान वयातच त्याने इतक्या गुन्ह्याचा तपास केला होता कि प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्याचे नाव ठाऊक होते. पण त्याच वेळी ह्या विचित्र ऑफिसर ने कित्येक प्रमोशने नाकारली होती. सरकारी गाड्यांतून फिरत रुबाब झाडण्यापेक्षा रस्त्यावर रात्री अपरात्री फिरून गुन्हे उकलण्यात कैलासाला मनापासून आनंद होता. पण ह्याच त्याच्या सवयीने त्याचे इतर सहकारी मात्र त्याला दचकून राहत. कुणी म्हणत असे कि कैलास खरे तर IB एजन्ट आहे तर कुणी म्हणत कि कैलास एक मनोविकृत आहे. कैलासाच्या ह्याच प्रवृत्तीवर नजर ठेवण्यासाठी त्याच्या वरिष्ठानी स्वरा नावाची नवीन स्त्री ऑफिसर त्याला पार्टनर म्हणून दिली. स्वरा खरे तर भ्रष्टचार विरोधी खात्यांत होती पण तिला इतर गुन्ह्यांत विशेष रस होता.
कैलासाला स्वरा आवडू लागली. म्हणजे त्या अर्थाने नाही. स्वरा अत्यंत अभ्यासू होती. कैलास प्रमाणे घिसडघाई ना करता ती व्यवस्थित प्लॅनींग करून निर्णय घ्यायची. पण ती रस्त्यावर किती उपयुक्त ठरेल ह्याची कैलासाला शंकाच होती. रात्री अपरात्री कुठल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा ब्रिजच्या खाली काहीही घडू शकते. त्यावेळी ती कश्या प्रकारे वागेल ? ती स्त्री म्हणून कदाचित माझ्या साठी जोखीम तर ठरणार नाही ना ह्याची कैलास ला कधी कधी शंका वाटायची.
मुंबईतील पावसाचे दिवस होते. दादरच्या प्लॅटफॉर्म वरून एक ५ वर्षांची चिमुरडी कुणी तरी उचलून नेली होती. आईने धाय मोकलून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच परिसरांत आणखीन २ किडनेप झाले होते आणि दोन्ही घटनात ४-५ वर्षांच्या चिमुरड्याने उचलून नेले होते. प्रकरण CBI कडे नसले तरी लोकल पोलीस खात्यांत कैलासचा मित्रच इन्स्पेक्टर होता आणि त्याने कैलासाची मदत मागितली होती. अनेक इतर केसमध्ये कैलासने दादर परिसरांत काम केले होते आणि त्याचे अनेक खबरी त्या भागांत वावरत होते. त्याशिवाय गुन्हेगारांचे विविध अड्डे कैलासाला चांगलेच ठाऊक होते.
पुढचे भाग वाचा
http://web.bookstruck.in/book/show/1256?&utm_source=sharelink&utm_medium=web&utm_campaign=whatsapp