ही भूतकथा कथा एका वाचकाने पाठवली आहे. हे वाचक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मध्यप्रदेशांत कार्यरत आहेत.
२००९ चा ऑगस्ट महिना होता आणि दिल्लीहून ऑर्डर आली के एका विदेशी महिला संशोधकाला घेऊन मी कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि चिलापी रेंज मध्ये जावे. तिचा प्रकल्प फार मोठा होता आणि जागतिक बँक आणि WWF ने त्यांत कित्येक दशलक्ष डॉलर्स ची गुंतवणूक केली होती. जेस्सी मॅडम, दोन प्राणी संशोधक, त्यांची एक विद्यार्थिनी एक कॅमेरामन, मी आणि एक स्थानिक गाईड शी एकूण ७ लोकांची पार्टी होती आणि आणखी ६ हमाल आम्ही बरोबर घेतले होते. एक टेम्पो आणि एक जीप जंगलतील वाटांतून जाण्यासाठी वाहन म्हणून होते. अनेक प्रकाच्या झाडांची सॅम्पल्स, प्राण्यांचे फोटो, दगडांचे नमुने वगैरे गोळा करायचे होते.
अनेक लोकांना वाटते कि जंगल म्हणजे घनदाट पशु पक्ष्यांची भरलेले वातावरण पण तसे नसते. जंगल कितीही मोठे आणि घनदाट असले तरी बहुतेक ठिकाणी तुम्हाला पक्षी प्राणी दिसत नाहीत. तसेच प्रत्येक जंगलांत आंत आदिवासी हे असतातच. अगदी कान्हा व्याघ्र प्रकल्पांत सुद्धा कित्येक आदिवासी भाग आहेत.
मी फॉरेस्ट ऑफिसर असलो तरी शहरी माणूस. बंदूक वगैरे घेऊन जंगलात फिरायला आवडते पण तिथे राहायला आवडत नाही. चिलापी रेंज मध्ये माझी नेमणूक झाली तेंव्हा मी सर्वप्रथम राहायला कुठे मिळेल ह्याची चौकशी केली. ह्या भागांत एकही फॉरेस्ट ऑफिसर राहत नव्हता त्यामुळे तशी काहीच व्यवस्था नव्हती पण सरकारी कागदांत एका ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने इथे फॉरेस्ट हाऊस बांधले आहे अशी माहिती मिळाली. डोंगरी ह्या भागांत एक आदिवासी कसबा आहे तेथील लोकांनी मला त्या फॉरेस्ट हाऊस चा पत्ता दिला. मी सरकारी पैशानी सर्वप्रथम तिथे जाण्यासाठी एक कच्चा रास्ता बांधून घेतला. फॉरेस्ट हाऊस अगदी पक्क्या चिऱ्यांचे बांधले होते. ग्लास खिडक्या तुटल्या होत्या पण आंतील लाकडी जिना अजून मजबूत होता.
माझे पहिले ६ महिने फक्त हे घर साफ करून राहण्यायोग्य करण्यात गेले. वीज अजून ह्या भागांत पोचली नव्हती म्हणून एक जनरेटर आणि एक भली मोठी तेलाची टाकी मागून घेतली. टाकी इतकी मोठी होती कि नंतर आजूबाजूच्या गावातले लोक पेट्रोल मागणीसाठी येऊन धडकू लागले .
मदतनीस म्हणून मी सूर्याला ठेवले हाच आमचा गाईड सुद्धा होता. तो शिकार करण्यात सुद्धा तरबेज असल्याने अधी मधी चांगली सागुती सुद्धा बनवायचा. कायद्याने मला फक्त छोटे पक्षी आणि कधी कधी हरणे मारण्याची परवानगी मिळत असे.
जेस्सी मॅडम आल्या तेंव्हा मी त्यांना ह्याच घरांत ठेवले तर त्यांच्या इतर सहकार्यांनी बाहेर तंबू ठोकला. हुनुमान टीला म्हणून जंगलात आंत खोलवर एक छोटा पहाड होता तिथपर्यंत जीप किंवा टेम्पो जात होता. त्यामुळे आधीचे तीन दिवस प्रवास फक्त हनुमान टीळा पर्यंत प्रवास करायचे ठरवले होते. प्रत्येक दिवशी आम्ही काही ४ मैल जायचो तंबू ठोकायचो आणि नंतर संशोधक मंडळाची गाईड वगैरे सॅम्पल्स गोळा करायला जंगलांत जायचे. मी आणि जेस्सी ह्या सगळ्यावर नजर ठेवायचो. जेस्सीला भारतीय जंगले, झाडे, त्यांची हिंदी नावे, आयुर्वेदिक वापर ह्यांची फार खोलवर माहिती होती.